Thursday, October 20, 2011

एक उत्तर...

"तीर्थरूप पपांस",  लिहिल्यानंतर अनेक reply आले होते...त्यापेकीच  एक म्हणजे संदीप यांचे हे पत्र....त्यांनी त्यांच्या मुलीला उद्देशून लिहिलेले ....




त्यांच्याच या पत्राला मी जो reply केला, तो असाच इथे ब्लॉग वर टाकत आहे....

"Hello....सर्वात प्रथम अभिनंदन....म्हणजे आपल्या मनात येणारा प्रत्येक विचार असा उघडपणे आणि प्रामाणिकपणे  मांडणे याला पण मोठे धैर्य लागते...
काही काही गोष्टी अगदी मनापासून आवडल्या...
जसे कि ती मुलगी पाहिल्यावर तुमच्या मनात आलेले विचार...आपल्याला मुलगी होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर आपला दृष्टीकोन कसा बदलतो हे तुम्ही खूप छान आणि प्रामाणिकपणे लिहिले आहे...
किंवा मुलीला बाप म्हणून निवडायची संधी दिल्यावर ती मला निवडेल का? हे देखील खूप आवडले...
स्वतःला असे तटस्थ होऊन प्रश्न विचारणे आणि तितक्याच तटस्थतेने  त्यांची उत्तरे शोधणे सोपे नसतेच मुळी...
एक बाप आणि एक पुरुष यांच्यातले द्वंद्व खूप छान मांडले आहे तुम्ही...
             आज एक मुलगी म्हणून सांगेल पण कि माझी पण family अगदी मध्यमवर्गीय...पण आयुष्यात पैसा हेच सगळे काही नसते...आज माझ्या बाबांनी मला इतके काही दिले आहे कि, माझ्या समोर अगदी एक गर्भश्रीमंत वडील असतील तरी मी नाहीच म्हणेल...मी सांगेल कि माझे पप्पाच मला हवे आहेत...आणि हा माझा choice असेल....
त्यांनी माझ्या पंखात जे बळ दिले आहे तेच लाख मोलाचे आहे....पैसा काय आज आहे आणि उद्या नाही...पण याच्याही पलीकडे त्यांनी मला माणूस  म्हणून जगायला शिकवले, जे कि मला आयुष्यभर पुरणार आहे....मी आज जे काही आहे ते फक्त त्यांचामुळेच आहे...
एक बाप म्हणून तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी वाटणे अगदी साहजिकच आहे
पण त्याचा अर्थ असा तर होत नाही ना, कि तुम्ही फक्त त्याचा आणि त्याचाच विचार करावा...
आयुष्यात खूप सारे रंग आहेत, आणि तुम्ही पाहिलेला,  मांडलेला त्यातलाच एक...
पण तो रंग म्हणजेच पूर्ण आयुष्य तर नाहीये ना....
तुमची कितीही इच्छा असली तरीही, तुम्ही आयुष्यभर तिचे संरक्षण कवच नाही बनू शकणार...
त्यापेक्ष्या तिच्या पंखातच इतकी ताकद भरा कि ती स्वताच समर्थ असेल या जगाचा सामोरा करण्यासाठी...
या जगात खूप छान छान गोष्टी आहेत ज्या तुम्ही तिला शिकावा...
तिला निर्भय बनवा....आज तुम्ही जो प्रश्न विचारात आहे ना कि मी चूक केली का?
तुम्ही तिला असे घडवा कि उद्या तुम्हाला तिचा  गर्व वाटेल...
तुम्ही अभिमानाने सांगू शकताल कि मी तिचा बाप आहे...
शेवटी एकाच सांगेल, एक चांगला बाप होण्यासाठी "श्रीमंत बाप" असणे कधीच गरजेचे नसते...
माफ करा मला जर मी काही जास्त बोलले असेल तर...
मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा वयाने देखील आणि अनुभवाने देखील..."

~अनिता 

No comments:

Post a Comment