Friday, June 24, 2011

अजुन उजाडत नाही ग!....अजुन उजाडत नाही !
अजुन उजाडत नाही !
दशकमागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा !
ना वाटान्चा मोह सुटे वा
ना मोहाच्या वाटा !
पथ चकव्याचा गोल
सरळ वा कुणास उमगत नाही !
प्रवास कसलाफरफट अवघी!
पान जलातुन वाही .....
अजुन उजाडत नाही !
अजुन उजाडत नाही !............