Thursday, July 14, 2011

भय इथले संपत नाही.....

Terrorist attack on Mumbai....Once again Mumbai on hit list....20 died, 150 injured.....

                                 महाराष्ट्रात HI security Alert...
सवय झाली आहे ना या सगळ्याची आपल्याला...घरात सोफ्यावर बसून २-४ news channel आपण surf करणार, अरेरे म्हणणार आणि सोयीस्कर पणे हे सगळे विसरून जाणार...२ दिवसांनी सकाळ  मध्ये  बातमी येणार "मुंबईतील जनजीवन सुरळीत "......सकाळी ८.१३ ची लोकाल पकडायला परत तीच गर्दी...
                   राज ठाकरे म्हणणार, "मुंबई पोलीस काय झोपले होते का?"... होम मिनिस्टर चिदंबरम म्हणणार "महाराष्ट्र सरकारला याची पूर्वकल्पना दिली होती" तर आपले आबा म्हणणार "स्फोटा प्रकरणी महत्वाचे धागेदोरे हाती"...सगळे कसे अगदी व्यवस्थित चालू आहे ना...जो तो आपापली जबाबदारी पार पडत आहे किमान कोणावर तरी व्यवस्थितपणे ती ढकलत तरी आहे...पूर्वी हेच घडले, आजही तेच घडणार नी पुढच्या वेळेस पण तेच...
                        माणसाचे  आयुष्य म्हणजे काय पत्त्यांचा  डाव असते का हो? वाऱ्याची झुळूक यावी आणि डाव मोडावा...असे कितीतरी डाव काल उध्वस्त झाले असतील ना...सकाळी office ला जायचे म्हणून घराबाहेर पडणारा बाबा, "बाबा मला colour पेन्सील घेऊन ये संध्याकाळी " म्हणून सांगणारा चिमुकला जीव...
त्याला काय माहित त्याचा बाबा आता परत आपल्याला परत कधी भेटणारच नाही म्हणून..काय दोष आहे यात त्या चिमुकल्या जीवाचा? बाबाला तरी माहित असते का हो कि ती संध्याकाळ कधी येणारच नाही म्हणून..कितीतरी स्वप्ने असतील जी अशी हवेतच विरून गेली असतील...
                         काय हक्क आहे कोणाला या सगळ्यांशी असे खेळण्याचा? आपल्या स्वार्थासाठी   अश्या  निष्पाप लोकांचा जीव का घेतात हे लोक? कारण काहीही असू देत, पण त्याची शिक्षा  ह्या निरपराध लोकांना का? जो मारतो तो असतो एक "दहशतवादी " माणूस आणि मरणारा असतो तो एक "सामान्य" माणूस....
फक्त विशेषणे बदलले म्हणून इतका फरक पडतो...माणसाचा राक्षस होतो का त्याने?
का नाही कळत वेदना "मरणाऱ्याची " "मारणाऱ्याला"? 
                      मुळात "जिहाद " वगेरे तत्सम कल्पनेसाठी कोणी असे काम करायला तयारच का होते?
आपल्याच वयाचा कसाब हातात AK४७वगेरे घेऊन मुंग्या मारल्याप्रमाणे माणसे मारतो...किती भयावह आहे हे...किती प्रचंड brainwashing केले असेल ना त्याचे....प्रत्येकाने आपापला धर्म, संस्कृती जपावी, वाढवावी...
पण हे करताना इतरांवर हा अन्याय का?आणि मुळातच कोणताही धर्म, देव असे निरपराध लोकांचे जीव घ्यायला नाही सांगत ना...परत हिंसा हे कोणत्याही प्रश्नाला उत्तर नसते ना...कोणी तरी यांना समजावून सांगा रे असे वागून , निरपराध लोकांचे जीव घेऊन ना  यांचे प्रश्न सुटणार आहे ना आपले...मला प्रश्न पडतो आपले  विवेकानंद, विनोबा भावे, गांधीजी या लोकांना माहित तरी आहेत का?
                   आणि एका कसाब ला फाशी देऊन का हे संपणार आहे? काल लादेन गेला, उद्या कसाब जाईल आणि परवा आणखी कोण तरी...पण तरीही हे चक्र का थांबणार आहे? आपल्या हाता-पायाला जेव्हा एखादी जखम होते ना, तेव्हा वरवर मलमपट्टी करून काही होत नाही...तसे केले तर वरून सगळे नीट दिसते, पण ती जखम चिघळत जाते आणि त्याचे gangrene होते....आणि हे होऊ नये यासाठी ती जखम मुळापासून साफ करून, नंतर त्यावर औषध मलम  वगेरे लावायला हवे...तरच ती जखम भरून येते...नाहीतर असे चक्र चालूच राहते....

No comments:

Post a Comment