Tuesday, July 12, 2011

पैलतीर??

जीव दंगला गुंगला रंगला आसा पिरामची आस तू..

परवाच हे गाणे ऐकत होते....गाणे खरेच खूप छान आहे...शब्द पण आणि आवाज पण...हरिहरन आणि श्रेया घोशाल यांनी सुरेख गायले आहे....
पण गाणे ऐकता ऐकता असेच खूप Serious झाले ..शब्द होते, 
पैलतीरा नेशील 
साथ मला देशील 
काळीज माझा तू
पैलतीरा नेशील तू???
खरेच आपल्या आयुष्यात असे होते का हो...
आपल्या आयुष्यात कोणीतरी अशीच स्वप्ने दाखवते पैलतीरा नेण्याची ..
आपण डोळे उघडे ठेवून जायला तयार होतो....
आणि खोल डोहात आल्यावर मात्र तो आपल्याला सोडून जातो...
खोल डोह आणि काळोख असतो आजूबाजूला...
आणि आपण वाहत असतो, भरकटत असतो एकटेच...
हात पाय मारतो, ओरडतो, रडतो पण काहीच होत नाही...
शेवटी परत एकदा उभारी घेतो आणि चालायला लागतो एकटेच...
किनार्यावर येऊन पोहोचतो पण आपण...

लहानपणी ऐकलेली चीउची गोष्ट आठवते...
ती बिचारी तिचे घरटे बांधत असते आणि कोणीतरी येऊन तिचे घर मोडून जाते...
चिऊ परत घरटे बांधायला घेते...आणि परत कोणीतरी येऊन ते घरटे उध्वस्त करून जाते...

आपले आयुष्य पण असेच असते नाही का...
प्रत्येक वेळी हेच घडत राहते ना आपल्यासोबत पण....


No comments:

Post a Comment