Friday, June 24, 2011

अजुन उजाडत नाही ग!....



अजुन उजाडत नाही ग!
अजुन उजाडत नाही ग!
दशकमागून सरली दशके
अन् शतकाच्या गाथा ग!
ना वाटान्चा मोह सुटे वा
ना मोहाच्या वाटा ग!
पथ चकव्याचा गोल
सरळ वा कुणास उमगत नाही ग!
प्रवास कसला? फरफट अवघी!
पान जलातुन वाही ग.....
अजुन उजाडत नाही ग!
अजुन उजाडत नाही ग!............